Traffic Signal Information In Marathi। Traffic Rules

Darja Marathicha
6 min readMar 11, 2021

--

Traffic Signal Information In Marathi। Traffic Rules

ट्रॅफिक सिग्नल हे रस्त्यावरचे मूक स्पीकर आहेत. रस्त्यावर चाकामागे असणारी व्यक्ती किंवा पादचारी असो सर्वाना रस्त्याच्या सुरक्षिततेबद्दल योग्य ज्ञान असणे सर्वांसाठी आवश्यक आहे. रहदारीची चिन्हे (ट्रॅफिक सिग्नल) बहुतेक महत्त्वाच्या ठिकाणी जसे की व्यस्त चौकांवर वाहतुकीच्या प्रवाहाचे नियमन करण्यासाठी ठेवण्यात येतात अशा डिव्‍हाइसेसद्वारे रहदारी सिग्नल दिले जातात ज्यात जड व्यावसायिक वाहने आणि कार ते दुचाकी आणि पादचारी या सर्वांचा समावेश आहे. तथापि, हे संकेत त्यांच्याशी संबंधित काही नियमांसह येतात. मूलभूतपणे, ट्रॅफिक सिग्नल नियम या चिन्हेचा कणा बनतात आणि त्यांचे पालन करणे सुलभ आणि जोखीम मुक्त रस्ता प्रवास सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे.

ट्रॅफिक सिग्नलपुढे रस्त्यांच्या स्थितीविषयी माहिती देतात, मुख्य क्रॉसरोड किंवा जंक्शनवर पाळल्या जाणा या सूचना पुरवतात, वाहनचालकांना इशारा देतात किंवा मार्गदर्शन करतात आणि रस्ता वाहतुकीचे योग्य कार्य सुनिश्चित करतात. रस्त्याच्या चिन्हेंबद्दल अज्ञात असणे म्हणजे वाऱ्यावर सावधगिरी बाळगण्यासारखे आहे. रहदारी चिन्हे या विषयी माहिती नसणे, याने आपले जीवन व मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. भारतात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी त्या व्यक्तीस आधी रहदारीची चिन्हे आणि प्रतीक (लेखी किंवा तोंडी) परीक्षा द्यावी लागते, ती परीक्षा पास झाल्यावरच लायसन्स मिळते. ट्रॅफिक सिग्नल आपल्याला सांगते कधी आपली गाडी थाबवावी कधी समोर घ्यावी,कुठे काम सुरु आहे,तर कुठे धोका आहे. अश्याच अतिशय आवश्यक असणाऱ्या ट्रॅफिक सिग्नल (Traffic Signal Information In Marathi) विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

चला तर मग….

ट्रॅफिक सिग्नल च्या रंगाविषयी माहिती-Traffic Signal Information In Marathi

Traffic Signal Information In Marathi। Traffic Rules In Marathi

लाल: लाल हा सहसा धोक्याशी संबंधित रंग आहे. ट्रॅफिक चिन्हाचा लाल वापर सामान्यत: अनिवार्य नियम आणि संभाव्य धोके दर्शवितो. जेव्हा ट्रॅफिक लाइट येते तेव्हा याचा अर्थ असा होतो की आपण थांबावे. वाहतुकीच्या चिन्हेसाठी, लाल रंगाचा वापर थांबण्याऐवजी इतर अर्थ दर्शविण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. हे सामान्यत: नियामक आणि सावधगिरीच्या चिन्हेसाठी वापरले जाते. लाल रहदारी चिन्ह कधीही वगळू नका.

पिवळा: ट्रॅफिक लाइटसाठी वापरल्या जाणार्‍या तीन रंगांपैकी पिवळा रंग देखील एक आहे. तथापि, रहदारी चिन्हात, आपल्याला लाल किंवा हिरव्यापेक्षा कमी पिवळा दिसतो. हा रंग दर्शवते ही वाहनाच वेळ कमी करावा , वाहने सुरु करावी आणि आता हिरवा रंगाचा सिंगल लागणारच आहे हे सांगते.

हिरवा: हिरव्या रंगाचा वापर सहसा माहितीपूर्ण चिन्हेसाठी केला जातो जे आपल्याला दिशा-निर्देश देतात किंवा एखाद्या विशिष्ट गंतव्यासाठी मार्गदर्शक असतात. मुख्यतः हिरव्या चिन्ह आपल्याला सांगते कि तुम्ही सुरक्षितपाने गाडी समोर घेऊ शकता.

वाहतुकीचे नियम -जाणून घ्या ट्रॅफिकचे रूल्स महत्वाचे नियम: Traffic Rules In Marathi

हेल्मेटचा वापर अनिवार्य

हेल्मेट हे सुरक्षेतेसाठी खूप जास्त महत्वाचे आहे. रस्त्यावरील होणाऱ्या अपघात टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर हा अनिवार्य आहे. लोकांच्या जिवाच्या सुरक्षेतेसाठी सरकार अत्यंत जागरूक आहे म्हणून सरकारने हेल्मेटचा वापर करण्याची सक्ती केली आहे. हेल्मेट न वापरल्याने जीव देखील गमवावा लावू शकतो, म्हणून हेल्मेट न वापरण्यावर दंड आकारल्या जातो. जर तुम्ही गादीवर हेल्मेट घालन विसरले तर तुम्हला सरासरी ५०० किंवा १००० पर्यंत दंड भरावा लागू शकतो. म्हणू न स्वतःची काळजी घ्या आणि हेल्मेट घाला.

वाहनाचे महत्वाचे कागदपत्रे व लायसन्स

तुम्ही जर वाहन चालवत असाल तर तुमच्या गाडी मध्ये किंवा तुमच्याजवळ वाहनाचे महत्वाचे कागदपत्रे व लायसन्स असणे खूप महत्वाचे आहे. नसल्यास तुम्हला दंड भरावा लागू शकतो.

वाहन चालवताना मोबाइलचा वापर

वाहन चालवताना मोबाइलचा वापर हे खूप घातक आहे. वाहन चालवताना आपले लक्ष फक्त समोर असले पाहिजे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्याने अपघात देखील होऊ शकते, म्हणून वाहन चालावताना मोबाइलचा वापर करताना पोलिसांच्या निदर्शनास आले तर तुम्हाला दंड भरवा लागतो.

गाडीच्या वेगाचे नियंत्रण (Speed Limit )

कोणतीही वाहन चालवताना स्पीड (वेग) नियंत्रणे मध्येच असावा. गाडीचा वेळ एका विशेष मर्यादेपर्यंत निश्चित आहे. सर्वानी त्याच स्पीड मध्ये वाहन चालवावे. असे म्हणतात किंवा असं कुठे तरी सांगितले आहे कि वाहनचा स्पीड हा ४० किलोमीटर प्रति तास असावा, हे सुरक्षतेसाठी खूप गरजेचे आहे. परंतु काही लोक मज्जा म्हणून खूप वेगाने गाडी चालवतात व जीव लामवतात, म्हणून स्पीड नेमही कमी ठेवा.

हॉर्नचा अति व चुकीचा वापर

रस्त्यावर खूप गर्दी आहे खूप वाहन आहेत, सर्वच वाहनांना समोर जायचे आहे त्या वेळी तुम्ही वारंवार हॉर्न देत असाल तर हे फार चुकीचे आहे. जासी तुम्हला घाई असते तशीच सारवण देखील असते. जिथे हॉर्नची आवश्यकता आहे तिथेच हॉर्न द्या विनाकरण देऊ नका त्या मुले ध्यानिप्रदूषण देखील होते. हॉर्नचा वापर योग्य प्रकारे करा हा वाहनाचा एक नियम आहे तो तुम्ही पालन नाही केला तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

ओव्हरटेक (Overtake )

ओव्हरटेक करताना दिशा व दुसऱ्या वाहनाचा ववस्तीत अंदाज घ्यावा. व जिथे गरज आहे तिथेच ओव्हरटेक करा. ओव्हरटेक करताना ववस्तीत वेळ निवडणे महत्वाचे आहे. खूपदा ओव्हरटेक करणे टाळा. कोणी आपल्याला ओव्हरटेक करत असणार तर आपला स्पीड कमी ठेवा. ज्याने अपघात टळेल.

इंडीगेटर चा योग्य उपयोग.

तुम्हला जेव्हा एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जायचे असते स्पीड करून तेव्हा मागे असणाऱ्या वाहनाना इंडिकेटर द्या, आणि मगच दिशा बदला. असे न केल्या अपघात होऊ शकतो आणि तुम्हला दंड देखील भरावा लागू शकतो.

चुकीच्या ठिकाणी पार्किंग

कोणत्या ठिकाणी पार्किंग करावी हे आधीच लिहलेले असते. परंतु जा ठिकाणी नो पार्कानी (No Parking) असं लिहाल असेल आणि तुम्ही तिथे पार्किंग केली असणार तर तुमचे वाहन जप्त किंवा तुम्हला दंड भरावा लागू शकतो. आणि तुमच्या अशा वागण्याने दुसऱ्या लोकांना देखील त्रास होऊ शकतो, म्हणून वाहन बरोबर ठिकाणीच लावावी.

वाहन चालवणाऱ्याचे वय

वाहन चालवण्यासाठी भारतटामध्ये वय देखील एक महत्त्वाचं नियम आहे. जर तुम्हला वाहन चालवयाचे असणार तर तुमचे वय हे १८ वर्ष पूर्ण हवे. त्या पेक्ष्या कमी असल्यास आणि तुम्ही वाहन चालवत असाल तर पोलिसांनी पकडल्यावर तुम्हला दंड भरावा लागतो. कमी वयाचे मुलांनी किंवा मुलीनी वाहन चालवू नये त्याने दुसरीच्या व त्याच्या जीवाला धोका असतो.

ट्रिपल सिट — एकाच वाहनावर ३ जण

तुम्ही तुमच्या दुचाकीवर तिघे जात असाल तर हे देखील ट्रॅफिक रूल्स च्या नियम विरुद्ध आहे आणि ट्रॅफिक पोलिसांच्या निदर्शनास आल्यास तुम्हला दंड भरावा लागतो.

एकच मार्गे (one way)

काही रसत्यावर एकाच मार्ग सुरु असतो. त्यामध्ये एक मार्गे जाण्याकरिता व दुसरा येण्याकरिता असतो. असे मार्ग निश्चित केले असतात परंतु काही लोक विरुद्ध दिशेने वाहन नेतात ज्याने रस्त्यावर गर्दी व जॅम बसतो किंवा अपघात देखील होऊ शकतो. हे टाळण्यासाठी वाहन चालवताना काही नियम व मर्यादा आहेत. ज्या मार्गे जाणारा आहे त्याच मार्गाने जा आणि येणाच्या मार्गाने यावे. जो हा नियम पाळणार नाही त्याला काही वेळेस दंड भरवा लागतो.

खालील विडिओ मध्ये ट्रॅफिक सिग्न दिलेले आहेत, अजून छान माहिती देतील.

Traffic Signal Information In Marathi। Traffic Rules In Marathi

Traffic Signal Information In Marathi। Traffic Rules In Marathi

ट्रॅफिकमध्ये वापरली जाणारी महत्वाची चिन्हे:

Traffic Signal Information In Marathi। Traffic Rules In Marathi

ट्राफिक वाहतुकीचे काही सामान्य नियम — Traffic Rules In Marathi

कृपया हे ट्राफिक चे काही सामान्य नियम नेहमी लक्षात ठेवावे.

  • वाहने नेहमी ट्रॅफिक सिग्नल नुसार चालवावे.
  • नेमही सर्वप्रथम रुग्णवाहिकेला मार्ग द्या.
  • वाहन हे नेमही डावीकडूनच चालवावे.
  • दोन वाहनांमध्ये नेमही योग्य अंतर ठेवा.
  • पैदल रस्त्यावर चालताना नेमही झेब्रा क्रोससिंग वरच चला.
  • वाहन पार्कींग निर्बंध असलेल्या ठिकाणी वाहन लावू नका.
  • नेमही हेल्मेट व कार चालावताना सीट बेल्ट लावावा.
  • वाहन चालवताना दुसऱ्या वाहनाशी स्पर्धा करू नका.
  • गर्दीच्या ठिकाणी, चौफुलीवर किंवा यू टर्न घेताना स्पीड कमी ठेवा.

वरचे सर्व नियम हे प्रत्येक राज्यात वेगळे आहेत किंवा सारखे सुद्धा असू शकतात परंतु सर्वंनी हे नियम काटेकोर पाने पळले पाहिजे. आपण आपल्या व लोकांच्या सुरक्षितेसाठी या सगळ्या नियमांचे व सिग्नलचे पालन केले पाहिजे जेणेकरून आपल्यासोबत व दुसर्यांसोबत कोणताहि वाईट अपघात होणार नाही. म्हणून आम्ही या traffic signal information in marathi लेख मध्ये ट्रॅफिक सिग्नल आणि ट्रॅफिक रुल या विषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयन्त केला आहे. वाहनाचे व वाहतुकीचे हे नियम (रूल्स) पालन करून प्रवास केला आपला प्रवास नेहमी सुरक्षित व आनंदी होऊ शकतो. आणि देश अपघात मुक्त करू शकतो.

लेख आवडल्यास कमेंट नक्की करा. काही सुधारणा किंवा सूचना असल्यास तर आम्हाला info.extrememotivations@gmail.com वर नक्की कळवा.

DarjaMarathicha वर लेख वाचलियाविषयी धन्यवाद!!

इंग्लिश मध्ये वाचण्यासाठी इथे बघा

--

--