Salmon Fish In Marathi | रावस मासा | Indian Salmon Fish

Darja Marathicha
4 min readFeb 20, 2021

--

Salmon Fish In Marathi | रावस मासा

Salmon Fish In Marathi: Salmon Fish ला मराठी मध्ये रावस मासा असे म्हणतात. भारतीय रावस माशाला जगभरात Indian Salmon Fish असेही म्हणतात. भारतात रावस मासा पश्‍चिम बंगाल व ओडिशा या राज्यांत पूर्व किनाऱ्यावर, तर गुजरात व महाराष्ट्र या राज्यांत पश्‍चिम किनाऱ्यावर आढळतो. पश्चिम बंगाल राज्यातून जाणारी गंगानदीची शाखा हुगळी नदीमध्येही हा मासा आढळून येतो. हिवाळ्याच्या दरम्यान हे मासे नदी मध्ये शिरतात.

शारीरिक परिमाण | Physical Dimensions of Salmon Fish In Marathi

विकिपीडिया नुसार रावस माशाचे जास्तीत जास्त लांबी २०० सेंटिमीटर बघितली गेली आहे.

रावस माशाचे जास्तीत जास्त वजन आतापर्यंत १४५ किलोग्रॅम सापडले आहे.

रावस माशाची सामान्य लांबी ५० सेंटीमीटर असते आणि त्यांचे शरीर दोन्ही बाजूला चपटे असते .

या माशांमध्ये नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.

रावस माशाचा शरीराचा रंग रुपेरी हिरवट असतो. माशाचे पोट व दोन्ही बाजू पिवळसर पांढऱ्या रंगाच्या असून तोंड आकाराने मोठे असते. माशाचे दात लहान असतात आणि ते थोडेसे ओठाबाहेर आलेले असतात. माशाचे पृष्ठपर व पुच्छपर करडे असतात आणि त्यांवर थोडेफार काळे ठिपके असून त्यांच्या कडा काळ्या असतात. अधरपराचा व गुदपराचा जवळपास अर्धा भाग केशरी रंगाचा (नारिंगी) असतो. अधरपराच्या पुढच्या बाजूस चार तंतुपर असतात.

रावस माशाचे प्रकार । Types of Salmon Fish In Marathi

जगभरात रावस माशाचे भरपूर प्रकार आहेत. भौगोलिक स्थानानुसार रावास फिशचे प्रकार वेगळे आहेत, जसे कि Atlantic salmon, Pacific salmon, Australian salmon, Danube salmon, Hawaiian salmon, Indian salmon म्हणजेच रावस मासा. आपण या लेख मध्ये Indian salmon fish बद्दल च माहिती बघतो आहोत.

भारतामध्ये हा मासा मुख्याता 2 प्रकारात सापडला जातो.

  • साधा रावस
Credits : Darjamarathicha.in
  • काला (काळा) रावस — दाडा
Credits : Darjamarathicha.in

रावस मासा : आहार आणि खाण्याच्या सवयी । Diet and Eating Habits of salmon Fish In Marathi

Indian Salmon fish म्हणजेच रावस मासा हे मांसाहारी आहेत.

हे मासे खेकडे, झिंगे व अस्थिमत्स्य माशांची पिले खातात.

रावस माशाचे प्रजनन । Reproduction Cycle of Salmon Fish In Marathi

हिवाळ्यामध्ये रावस मासे नद्यांच्या प्रवाहात किंवा खाडीमध्ये जातात. त्यानंतर हिवाळ्यात नदी/खाडीमध्ये आणि मादी यांचे मीलन होते. रावस माद्या वर्षातून दोन वेळा अंडी देतात. पहिल्यांदा जानेवारी-मार्च दरम्यान आणि दुसऱ्यांदा जुलै-सप्टेंबर या काळात रावस माद्या अंडी घालतात.

रावस माशाची मासेमारी । Fishing of Salmon Fish In Marathi

  • साधारणतः सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात पश्‍चिम किनाऱ्यावर रावस मासे पकडण्याचा हंगाम जोरात चालतो.
  • फेब्रुवारी ते मे या काळात पूर्व किनाऱ्यावर रावस मासे पकडण्याचा हंगाम जोरात चालतो.

खाद्यमत्स्य । As a Food — Salmon Fish In Marathi

रावस मासा हा रसाळ पांढर्या मांसासाठी आणि उत्तम चवीसाठी हा एक खूप लोकांचा आवडता पदार्थ आहे. पांढरे मांस आणि टणक पोत असलेल्या स्वादिष्ट चवसाठी रावस मासा प्रसिद्ध आहे. सध्या रावसपेक्षा काळा रावस (दाडा) चवीमध्ये खूप उत्कृष्ट असतो. त्यामुळे काळा रावस थोडा महाग असतो.

रावस माश्यांपासून बनवण्यात येणारे खाद्यपदार्थ | Rawas Fish Dishes In Marathi:

रावस माशांपासून भरपूर असे खाद्यपदार्थ बनवता येतात. काही उत्तम असे छोटे पाककृती चे व्हिडिओ बघून आपल्याला ५ ते ६ मिनिटांमध्ये रावस च्या काही डिशेसची कल्पना येऊन जाईल.

१) रावस चे कालवण | RAWAS FISH CURRY (Indian Salmon Fish Curry)

https://youtu.be/LkR9H-5avw0

Credits: Being Marathi Recipes

2) Ravas Tawa Fry | Indian Salmon Fish Fry Recipe | Seafood Recipe In Koli Style | रावस तवा फ्राय

https://youtu.be/rUEurjvWoEo

Credits: Mi Hay Koli

रावस माशांपासून असलेले फायदे । Benefits of Salmon Fish In Marathi

  • रावस माशामध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तदाब (Blood Pressure) कमी होतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते.
  • रावस मासा प्रथिनचा (Proteins) महान स्रोत आहे.
  • या माशामध्ये बी जीवनसत्त्वे (Vitamin B) जास्त असतात.
  • या मासा पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे.
  • रावस माशाचे सेवन हृदयरोगाचा धोका कमी करू शकेल.
  • रावस मासा सेवनाने वजन नियंत्रणास फायदा होऊ शकेल तसेच मेंदूच्या आरोग्यास संरक्षण देऊ शकेल.
  • रावस माशाचे सेवन दृष्टीसाठीपण (Eyesight) फायदेशीर आहे.

FAQ

What is Salmon Fish called in Marathi & in Hindi?

In India, Indian Salmon Fish is called as ‘Rawas in Marathi (रावस मासा) & Hindi ( रावस मच्छी).

दर्जा मराठी वर Salmon Fish In Marathi। रावस माशाबद्दल वाचण्यासाठी धन्यवाद! आम्ही अपेक्षा करतो कि आपल्याला हवी ती माहिती आम्ही देऊ शकलो.

आम्ही माहिती एकत्र करून आपल्या समोर आणायचा प्रयन्त करत असतो. तुम्हला लेख कसा वाटला? आणि आम्ही या मध्ये काय सुधारणा करू शकतो? हे आम्हला कंमेंट मध्ये नक्की कालवा. आम्ही काही नवीन माहिती या मध्ये भर करू शकतो का, हे नक्की सांगा, आम्ही त्याचा नक्की समावेश करू.

कृपया credit साठी आम्हाला info.extrememotivations@gmail.com वर मेल करा.

Originally published at https://darjamarathicha.in on February 14, 2021.

--

--

No responses yet